प्रीत बहरून यावी
अशीही काही,
रातराणीचा सुगंध तिला
बीलगुण राही…
सुगंधापरी मीही विरघळावे
असेही काही,
तुला मिठीत घेताच
सुरांची मैफिल होऊन जावी…
सखे तूच सोबती
तूच सहवास माझा,
आयुष्याच्या वचनाप्रमाणे
मी कायमच असेल तुझा…
साथ जन्माची
अशीही काही असावी…
मंत्रमुग्ध निसर्गाने,
साक्ष प्रीतीची द्यावी…
_@sanjkavi