थंडीमुळे आज
चाफा ही गारठला होता,
सुगंध पसरायला जरा
त्याला वेळच झाला होता.
काटे असूनही गुलाब
थंडीत सुंदर दिसत होता,
केसात माळला जाईन..
की देवाच्या चरणी जाईन,
याचाच विचार करत होता.
🌸 आबोली मात्र
शांत बसली होती’
थंडीची मखमली
चादर तीने लपेटली होती.
मोगऱ्याला उठण्यास
जरा उशीरच झाला होता,
पण.. सुवास मात्र त्याने
मध्यरात्रीच दरवळला होता.
रात्रभर जागरण करून
रातराणी नुकतीच उठली होती,
पानावरच्या दवबिंदुशी
काही तरी गुजगोष्टी करत होती.
गंधाळलेल्या नजरेनी
निशीगंध सारे पहात होता,
थंडीतल्या कोवळ्या किरणाना
तो हसत अंगावर घेत होता.
गुलाबी थंडीतही ही
फुलांची अशी मजा चालली होती,
संकटातही मजेत रहा, असे..
प्रत्येक पाकळी जणू सांगत होती
🙏 🙏🙏
गुलाबी थंडीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा….. ll